18 of February 2019, at 3.49 pm

कर्नाटकातील पोटनिवडणुकीत ६६ टक्के मतदान

बंगळुरू - कर्नाटकामध्ये ३ लोकसभा आणि २ विधानसभा जागेसाठी शनिवारी पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये एकून ५४.५ लाख मतदारांपैकी ६६ टक्के मतदारांनी निवडणूकीत सहभाग नोंदविला, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मतमोजणी ६ नोव्हेंबरला होणार आहे.

या पोटनिवडणुकीचे मतदान शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. बेलारी, मंड्या आणि शिमोगा या ३ लोकसभा मतदारसंघासाठी तर जमखंडी आणि रामनानगर या २ विधानसभा मतदार संघासाठी पोट निवडणूका पार पडल्या. काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली.

Comments