मराठवाड्याची तहान भागणार ; नगरमधून जायकवाडीला पाणी सोडलं

येस न्युज मराठी नेटवर्क : पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मराठवाड्याची तहान अखेर भागणार आहे. समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आज सकाळपासून जायकवाडीला पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

पुढील सात ते आठ दिवस हे आवर्तन चालणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभाचे मुख्य अभियंता किरण देशमुख यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि इतरांची याचिका फेटळाली. त्यामुळे आता मराठवाड्याला 8 टीएमसी पाणी मिळणार आहे.

Comments