18 of February 2019, at 3.21 pm

डॉ.हरिदास जोगदनकर यांनी प्राप्त केल्या एमबीए, पीएचडी पदव्या

सोलापूर : मान्यताप्राप्त आर्थिक लेखा विधी सल्लागार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादशी संलग्नित वरिष्ठ महाविद्यालयातील बिझनेस इकॉनॉमिक्सचे विभाग प्रमुख, कॉमर्सचे प्राध्यापक डॉ.हरिदास जोगदनकर यांनी आजपर्यंत कला, शास्त्र, वाणिज्य, सहकार, कायदा, व्यवस्पिन, संगणक शिक्षणाशास्त्र अशा वेगवेगळ्या विद्या शाखेतून एमए अर्थशास्त्र, एमकॉम कॉमर्स, एमकॉन अ‍ॅडनिनीस्ट्रेशन अशा डझनपेक्षा जास्त पदव्यूत्तर पदव्या असताना यावर्षी त्यांनी एमबीए फायनान्स मॅनेजमेंट विषयातून व पीएचडी कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेंट विद्याशाखेतून अशा दोन पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांच्या इम्पॅक्ट ऑफ अ‍ॅडवान्स्ड टेक्नॉलॉजी ऑन ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनीस्ट्रेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज् इन महाराष्ट्र या शोध निंबधास नॉर्थ महाराष्ट्र युनिर्व्हसिटी जळगाव यांनी मान्यता दिली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी स्वत: पीएचडी नोटीफिकेशन डॉ.जोगदनकर यांना प्रदान केले. या संशोधनास मार्गदर्शक म्हणून पीओ नहाटा कॉमर्स कॉलेजच्या प्राचार्य डॉ.मिनाक्षी वायकुळे वायकुळे यांनी मार्गदर्शन केले. त्याच महाविद्यालयातील त्याचे सहकारी प्राध्यापक डॉ.अरविंद चौधरी यांनी एमबीएसाठी मार्गदर्शन केले. जोगदनकर यांच्या या यशाबद्दल तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे यांनी सत्कार केला. या शैक्षणिक यशाबद्दल फेसबुकर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील डॉ.जोगदनकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच समाजातील विविध स्तरातून व त्यांचे सहकारी मित्रमंडळी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

Comments