18 of February 2019, at 4.12 pm

केशकर्तनकाराने 480 मिनिटात 972 जणांचे केस कापून रचला विश्वविक्रम !

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील दोन केशकर्तनकारांनी चक्क कमी वेळात सर्वाधिक जणांना केस कापून विश्वविक्रमाची नोंद केलीय. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे असे विक्रम करणाऱ्या दोन केशकर्तनकारांची नावं आहेत. मनोज शिंदे आणि पूनम शिंदे 'बियॉन्ड ब्युटी सलून'चे संचालक आहेत. कोण कसला विश्वविक्रम करेल, याचा पत्ता नाही.

अहमदनगरमधील बाणेश्वर विद्यालयात सकाळी मनोज आणि पूनम यांनी केस कापण्याला सुरुवात केली आणि पुढील आठ तासात (480 मिनिटं) तब्बल 972 जणांचे केस कापले. या 972 जणांमध्ये स्त्री आणि पुरुषांचाही समावेश होते.

Comments