18 of February 2019, at 4.37 pm

आता मोबाईल अ‍ॅपव्दारे होणार दहावीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला निर्णय

येस न्युज मराठी नेटवर्क : दहावीसाठी घेण्यात येणारी कल मापन चाचणी आता मोबाईल अ‍ॅप द्वारे घेण्याचा निर्णय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक अंमलबजावणी करण्यासाठी सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक -उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिवांनी दिली.

श्यामची आई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी ही कलमापन चाचणी घेण्यात येते. यावर्षी ही चाचणी महाकरियर मोबाईल अ‍ॅप द्वारे याचा निर्णय माध्यमिक उच्च माध्यमिक महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.

Comments