महावितरणला तोटा, तुमचं लाईट बिल वाढणार!

महावितरणला विक्रमी 30 हजार कोटींचा तोटा

लातूर : तुमचं वीज बिल आजवर हजार रुपये येत असेल, तर ते आता 1 हजार 350 रुपये येणार आहे. कारण तुम्हाला वीज पुरवणाऱ्या महावितरणला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे. आणि हाच तोटा पुन्हा ग्राहकांकडूनच भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.

गेल्या दीड वर्षात महावितरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

 

वीज आहे पण खरेदीदार नाही

महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या उद्योगांनी महागड्या विजेमुळे महावितरणच्या विजेला रामराम केला आहे. त्यामुळे कंपनीकडे वीज आहे पण खरेदीदार नाही अशी अवस्था झाली आहे. परिणामी महाराष्ट्रातली आजवरची सर्वात मोठी वीजदरवाढ करण्याची मागणी कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे.विजय मल्ल्या....निरव मोदी....डीएकसे अशा सगळ्या महाभागांना मागं टाकणारा कारभार महाराष्ट्रात घरोघरी वीज पुरवणाऱ्या महावितरण कंपनीनं करुन ठेवला आहे. एअर इंडिया प्रमाण महावितरण पूर्ण डब्यात गेली आहे.

Comments