भाऊजी झाले ट्रॅफीक हवालदार

भरपावसात आदेश बांदेकर वारकऱ्यांच्या सेवेत...

सोलापूर,दि. १० - भाऊजी या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले आदेश बांदेकर काल दिवेघाटात ट्रॅफीक हवालदाराच्या भूमिकेत पाहयला मिळाले...चित्रपट, टीव्ही सिरीयल, राजकारण आणि समाजकारणात आदेश बांदेकर यांचा दबदबा आहे पण काल  त्याचं वारकऱ्यांच्या मदतीसाठी भर पावसात धावून जाणं अनेकांना भावलं... भाऊजी एका शो च्या शूटच्या निमित्ताने दिवे घाटात गेले होते.दरम्यान पंढरपूर कडे प्रस्थान ठेवलेल्या संतांच्या पालख्या या  घाटात पोहचल्या, संपूर्ण घाट वारकरी आणि त्यांच्या वाहनांनी जाम झालाघाटात अडकलेल्या वारकरी भाविकांना पुढेही जाता येईना आणि मागेही...वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयन्त तोडले पडू लागलेपावसाची रिपरिप आणि खोळंबलेल्या वाहतुकीमुळे आबालवृद्ध बेहाल झाले. वारकऱ्यांचे हाल पाहून भाऊजी पोलिसांच्या मदतीला धावून आले आणि वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला लागलेवारकऱ्यांना हात जोडून एका बाजूने चालण्यास सांगून मोठ्या गाड्यांना रस्ता करून दिला

             पावसाची तमा न बाळगता, आपण सेलिब्रेटी आहोत शिवसेनेचे नेते आहोत सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री आहोत हे सगळं विसरून आदेश बांदेकर यांनी ट्रॅफिक हवालदाराच्या भूमिकेत शिरलेवाहतुकीच्या सूचना देणारे पोलीस नसून आपले लाडके भाऊजी आहेत आणि ते आपल्याला विनंती करीत आहेत म्हटल्यावर वारकऱ्यांनी हसतमुखाने सूचनांचे पालन केलेपावसाची तमा न बाळगता आपण कोण आहोत हे विसरून बांदेकरांनी केलेली ट्रॅफिक हवालदाराची भूमिका सच्चा शिवसैनिक असल्याची पोहच आहे....

Comments