18 of February 2019, at 4.40 pm

वारक-यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी

तुकाराम महाराज यांच्यासह संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर दि. 7 :- लाखो वारक-यांचे श्रध्दास्थान असणा-या पंढरपूरच्या आषाढीवारीस प्रारंभ झाला आहे. विठू नामाचा गजर करीत आणि टाळ मृदुंगाच्या साथीने लाखो वाकरी देहे – आळंदी येथून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह संतांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.

वारक-यांच्या पंढरपूर पर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा, पंढरपुरात स्वच्छता, सुरक्षितता राखली जावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदीर समिती, पंढरपूर नगरपरिषद आणि स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची अभिराम सराफ यांनी आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर मुलाखत घेतली. या मुलाखतीत    डॉ. भोसले यांनी रस्ते सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, आरोग्य सुविधा, दिंडीच्या निवासाची व्यवस्था याबाबत माहिती दिली.

आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे आणि जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांनी मुलाखतीचे संयोजन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी रमेश गोखले, पद्माकर कुलकर्णी,सुजित बनसोडे उपस्थित होते.

 

मुद्दे पुढीलप्रमाणे :-

* स्वच्छतेवर भर

* आषाढी वारीत स्वच्छतेला प्राधान्य

* 16 जुलैला अधिकारी – कर्मचारी करणार श्रमदानाने स्वच्छता

* इतर नगरपारिषदेचे 1000 कर्मचारी पाचारण करणार

* मंदीर समितीकडून मंदीरातील, परिसरातील स्वच्छता, 200 कर्मचारी नियुक्त

* स्वयंसेवी संस्थाही सहभागी होणार

 

आरोग्य  सुविधा

* प्रत्येक दोन किलोमीटरवर वैद्यकीय पथक

* आरेाग्य सेवेसाठी 600 अधिकारी – कर्मचारी नियुक्त

* पालखी मार्गावर औषध फवारणी, पाण्याचे निर्जंतुकीकरण

* ग्रामीण आरोग्य, उप रुग्णालयात ओषधांचा साठा, रुग्णवाहिन्या तैनात

 

वाहतूक सुविधा

 

आवश्यकतेनुसार वाहतुकीच्या मार्गात बदल

* दिंडीत सहभागी वाहनांना पासेस

* पासेस- असलेल्या वाहनांनाच धर्मपुरीपासून पुढे प्रवासास परवानगी

* दिंडीत कमीत कमी वाहने ठेवणचे आवाहन पंढरपूरात 14 ठिकाणी वाहतूक तळ विकसित   ..2..

                                     

 

*वारक-यांसाठी सुविधा

 

65  एकर परिसरात निवासाची व्यवस्था

* वाखरी तळावर पाणी, आरोग्य, शौचालय पुरवणार

* दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा पुरवणार

* प्रत्येक पालखी तळावर पाणी, शौचालये, रॉकेल, गॅस पुरवठा विभागातर्फे पुरवणार

* सिंगल विंडो सिस्टिम आणि पंढरपूर आषाढी वारी 2018 मोबाईल ॲप्लिकेशनची निर्मिती

 

*सुरक्षितता

 

चंद्रभागा नदी पात्राततील खडृडे मुजवले

* पंढरपूरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी पथके कार्यरत

* प्रदक्षिणा मार्गावर अतिक्रमण होऊ देणार नाही

* जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे नियोजन पूर्ण

* इतर जिल्ह्यातून 5000 पोलीस कर्मचारी मागवणार

 

*समन्वय

 

पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांसाठी समन्वय अधिकारी नियुक्त

* प्रत्येक पालखी तळासाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी

* विविध विभागाचे अधिकारी उपलब्ध असणार 

* दोन्ही मार्गावर आणि पंढरपूरात एकवीस ईओरी ( इमर्जन्सी ऑपरेटींग सेंटर ) असणार             

 

*परतीचा प्रवास

* एस.टी. सेवेची चार ठिकाणी तात्पुरती स्थानके

* रेल्वेच्या जादा गाड्यांचे नियोजन

* मराठवाडा, विदर्भाकडे जाणा-या एसटी साठी स्वतंत्र व्यवस्था

* सोलापूर, मोहोळकडे येणा-या एसटी बससाठी स्वतंत्र स्थानक

Comments