टिकेची झोड उठल्यानं रितेश देशमुखचा माफीनामा..

भावना दुखावण्याचा हेतू नव्हता अशी भावना व्यक्त केली भावना

मुंबई, दि ६ ः सोशल मीडियावरुन रितेश देशमुखवर टीकेची झोड उठल्यावर त्यानं आपला माफीनामा सादर केलाय. आपला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्‍हता असंही त्यानं म्‍हटलंय.या प्रकरणावर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती..प्राधिकरणच्या बैठकीत याबाबत नियमावली तयार करणार असल्याचेही त्यांनी म्‍हटलंय. आज सकाळ पासून सोशल मिडीयावर काही सेलिब्रिटींचे रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मूर्तीकडे पाठ करुन काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, दिग्‍दर्शक रवी जाधव, पानिपतकार विश्वास पाटील आणि सहकारी ५ जुलै रोजी रायगडावर गेले होते. याठिकाणी त्यांनी राजदरबारातील शिवाजी महाराजांच्या शेजारी मेघडंबरीत बसून फोटोसेशन केले. ते फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. रितेशसह रवी जाधव आणि विश्वास पाटलांचे हे कृत्य सोशल मीडियावरील अनेकांना आवडले नाही. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. काहींनी तर रितेश आणि इतरांना शिव्यांची लाखोली वाहिली. यानंतर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजी छत्रपती यांनीही हे कृत्य निंदणीय ठरवत नाराजी व्यक्‍त केली. त्यामुळे रितेश देशमुखने सोशल मीडियावरून माफी मागत कुणालाही दुखवायचा हेतू नसल्याचे म्‍हणत माफी मागितली आहे.

Comments