18 of February 2019, at 4.26 pm

शिवरायांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्याने रितेश देशमुख अडकणार वादात

रायगड - चित्रपटामध्ये एकापेक्षा एक थरारक दृश्ये देणारा सिनेअभिनेता रितेश देशमुख याने रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढला आहे. त्याच्या या फोटोसेशनमुळे तो वादात अडकण्याची शक्यता आहे. रायगड किल्यावरील मेघडंबरीत शिवरायांचा पुतळा बसवलेला आहे. सारे शिवभक्त त्या ठिकाणाचे पावित्र्य पाळत असतात. मेघडंबरीच्या बाजूला उभे राहून अनेकजण फोटोग्राफी करतात. मात्र रितेश देशमुख याने शिवरायांच्या मेघडंबरीत बसून फोटो काढल्याने तो वादाचे कारण ठरू शकतो.

Comments