24 of April 2019, at 1.45 pm

डाँ.आंबेडकर यांच्या कार्याचे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रदान

श्रीमंतयोगी प्रतिष्ठानने दिली भीमविचारांची प्रेरणा 

सोलापूर : विश्वभुषण डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रदान करुन आदर्श विचारांची प्रेरणा देण्याचा उपक्रम श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी राबाविण्यात आला. 

      श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी सकाळी भंडगे गल्ली जवळील आदर्श हायस्कूल व प्रशाला  मधील विद्यार्थ्यांना डाँ.आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकांचे वितरण करुन अभिनव पध्दतीने भीमजंयती साजरी करण्यात आली. अखंड १८ तास अभ्यास करुन डाँ.आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहिले. त्यांच्या कार्याची व विचारांची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशातुन हा उपक्रम राबविण्यात आला.


    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आदर्श हायस्कूलचे अध्यक्ष संजय इंडे, ऍड. सायबर गुन्हाचे आभ्यासक मजुनाथ कक्कळमेली,  आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक आशोक भुसारे ,प्रशालाचे मुख्याध्यापिका विद्या भुरले, सहशिक्षक नेनु बनसोडे, आक्कलवाडे ,प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.प्रारंभी डाँ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

      सुत्रसंचालन चिदानंद पाटील यांनी केले . आभार दयानंद तेली यांनी मानले. याप्रसंगी स्मिता धोनसले, मयुर गवते, शुभम कासट, सागर घुले, नितिन कुरकर्णी,  प्रशांत हिबारे, रूपेश शिवशरण, सचिन हुंडेकरी, शंकर बडगर, विजय छंचुरे, सुरेश लकडे आदीसह कार्यकर्ते  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
डाँ.बाबासाहेबांच्या विचारप्रेरणेतुन विद्यार्थी घडतील

 " शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.जो पेईल तो गुरगुरणाच हा प्रेरणामंत्र डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्यांच्या आदर्श विचारांच्या प्रेरणेतुन विद्यार्थी घडतील.त्यासाठी डाँ.आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे पुस्तक विद्यार्थांना देण्याचा उपक्रम घेतला असे संस्थापक महेश कासट यांनी सागितले.

Comments