24 of April 2019, at 2.23 pm

गौरवोद्गार वर्तुळ फेम जुई गडकारी यांची  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्थ अमोलराजे भोसले यांच्या उत्तम व्यवस्थापनामुळे दररोज हजारो भाविकांना महाप्रसाद दिला जातो. हे मला पाहायचे होते. अनं पाहून डोळ्याचे पारणे फिटलं असे गौरवोद्गार वर्तुळ फेम ZEE युवा वाहिनीचे आघाडीचे कलाकार जुई गडकारी (ठाणे) यांनी काढले. ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. 

          यापूर्वी जुई गडकरी यांनी पूर्वी, पुढच पाऊल, बिग्ग बॉस, सरस्वती, माझिया प्रियला, तुझ वीण सख्यारे, बाजीराव मस्तानी या विविध मालिकेत काम केले आहेत.

      यावेळी मंडळाचे बाबुषा महिंद्रकर, बाबासाहेब घाडगे, एस.के.स्वामी, महादेव स्वामी, सिद्धाराम पुजारी, सतिश  महिंद्रकर, समर्थ, घाडगे, सिद्धाराम कल्याणी, महांतेश स्वामी, बाळासाहेब पोळ, धानाय्या उमदी, नामा भोसले, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments