24 of April 2019, at 1.22 pm

पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणूक ; दोन पॅनेलमध्ये लढत 

सोलापूर - पद्मशाली शिक्षण संस्थेची निवडणुकीत सत्ताधाऱ्यांपुढे विरोधकांनी 'विकास पॅनेल' करून आव्हान दिले आहे. २५ विश्वस्त पदासाठी ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. डॉ. विजयकुमार अरकाल, डॉ. माधव गुंडेटी, अशाेक इंदापुरे, सुरेश फलमारी आदींसह ४२ जणांनी माघार घेतली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जी. पी. कदम यांनी सांगितले. २१ एप्रिल रोजी संस्थेच्या कुचन प्रशालेत मतदान होईल. एकूण १ हजार ६० मतदार हक्क बजावतील. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करून रात्री निकाल जाहीर होईल. 

सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे उमेदवार (चिन्ह टीव्ही) : दशरथ गोप, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्याल, दिनेश यन्नम, पांडुरंग दिड्डी, अशाेक चिलका, प्रा. श्रीनिवास कोंडी, काशीनाथ गड्डम, मल्लिकार्जुन सरगम, लक्ष्मीकांत गड्डम, हरिष कोंडा, व्यंकटेश आकेन, संगीता इंदापुरे, प्रसाद पल्ली, रमेश केदारी, विजयकुमार गुल्लापल्ली, रमेश विडप, श्रीनिवास जोग, मधुकर कट्टा, श्रीनिवास पोशम, अॅड. श्रीनिवास कटकूर, गणेश गुज्जा, प्रभाकर अरकाल, नागनाथ श्रीरामदास, रमेश बोद्धूल. 

अपक्ष उमेदवार : मोहन नारा, पांडुरंग यनगंटी आणि दत्तात्रय कुंटला. यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी विकास पॅनेल (चिन्ह शिलाई मशीन) : चंद्रशेखर वडनाल, गणेश पेनगोंडा, जनार्दन कारमपुरी, अजय अन्नलदास, मनोहर इगे, रमेश कैरमकोंडा, दयानंद कोंडाबत्तीनी, नरहरी कौकुंटला, लक्ष्मीनारायण कमटम, उमेश आडम, अरविंद गोप, दिगंबर चिन्नी, लक्ष्मण मडूर, नरेश पासकंटी, ज्ञानेश्वर अर्शनपल्ली, व्यंकटेश रच्चा, प्रशांत बेत, अंबादास गज्जम, रुपाली कोळा, अंबादास आरगोंडा, श्रीनिवास कोंपल्ली, अंबादास मिठ्ठाकोल, जगन्नाथ कुरापाटी, बालाजी जक्का, नागबाबू कुडक्याल. 

Comments