24 of April 2019, at 1.55 pm

प्रकाश आंबेडकरांना ओवीसीने उचलले अन् जल्लोष झाला

येस न्युज मराठी नेटवर्क :वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवारी सायंकाळी सोलापुरातील पार्क मैदानावर आयोजित केलेल्या सभेस मोठी गदर् ी झाली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर, खा. ओवेसी, आ. वारीस पठाण, आ. इस्तियाज जलील, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, आडममास्तर, तौफिक शेख, आनंद चंदनशिवे यांच्यासह दलित, मुस्लिम, धनगर आदी विविध समाजाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

   सभेच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आल्यानंतर एकच जल्लोष झाला. त्यांचा सत्कार करताना ओवेसी यांनी आंबेडकरांना उचलून घेतले आणि अख्खे पार्क मैदान जल्लोषमय झाले. 

   यावेळी ओवेसी यांनी तडाखेबाज भाषण करुन मोदींवर टीका केली. आंबेडकरांना मतदान करण्याचा विश्‍वास द्यावा यासाठी त्यांनी उपस्थितांना मोबाईलमधील टॉर्च लावायला सांगितली आणि पार्क मैदानाचे दृश्य मोबाईल टॉर्चम ुळे मस्तच झाले होते.

  प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांची मने जिंकली.

Comments