23 of March 2019, at 10.29 am

अपंग दिनानिमित्त मोफत जयपुर फुट शिबिराचे आयोजन

येस न्युज मराठी नेटवर्क :श्री आदीश्वर  जैन जनसेवा मंडळ आणि महावीर विकलांग सेंटर राजस्थान यांच्यावतीने रविवार दिनांक 17 मार्च मंगळवार दिनांक 19 मार्च 2019 दरम्यान जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांसाठी मोफत पोलिओ कॅलिपर जयपूर फूट शिबिराचे आयोजन रविवारी  शिंगवि भवन सम्राट चौक  या ठिकाणी करण्यात आले आहे.

            तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन  ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय ठिकाणी करण्यात आले आहे. श्री आदीश्वर  जैन जनसेवा मंडळ आणि महावीर विकलांग सेंटर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतात, गेल्या चाळीस वर्षापासून संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. रोटी घरच्या माध्यमातून रोज शंभर गरजू व गरीब लोकांना 2 रुपया मध्ये चपाती भाजी दिली जाते यास जैन रोटी घर संबोधले जाते. या शिबिराचे उद्घाटन पालिका आयुक्त दीपक तावरे ,प्रदीप हिरडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. गरजू व गरीब व्यक्तींना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव कल्पेश मालू आणि उपाध्यक्ष हर्षल कोठारी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
 

      या पत्रकार परिषदेस अध्यक्ष भागचंद कोचर कोषाध्यक्ष संजय भंसाली रमेश जैन महेश झाबक चेतन बाफना आदी उपस्थित होते.

Comments