23 of March 2019, at 9.38 am

इंग्लंडच्या हॅनीमन होमिओपॅथी कॉलेजच्या लेक्चररपदी डॉ. हिरा अग्रवाल

सोलापूर : इंग्लंड येथील हॅनीमन कॉलेज ऑफ होमिओपॅथीच्या विझीटींग फॅकल्टीअंतर्गत विझीटींग लेक्चरर म्हणून सोलापूर येथील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ व श्रीराम होमिओपॅथी क्लिनिक अँन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. हिरा अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजकडून नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र पाठविण्यात आले आहे.

१९८० पासून कार्यरत असलेल्या हॅनीमन कॉलेजमध्ये होमिओपॅथीचे सर्व प्रकारचे अभ्यासक्रम चालविले जांतांत. होमिओपॅथीचे शिक्षण देणाऱ्या जगभरातील नावाजलेल्या संस्थामध्ये हॅनीमन कॉलेजचा समावेश होतो. देशविदेशातील होमिओपॅथीचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांची या कॉलेजमध्ये विझीटींग लेक्चरर म्हणून निवड करण्यात येते. डॉ. अग्रवाल हे श्रीराम होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून सोलापुरात कार्यरत आहेत. त्यांची सेवा व अनुभव लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. कॉलेजच्या माध्यमातून राबविण्यात येणारी विशेष चर्चासत्रे आणि कार्यशाळेत डॉ. अग्रवाल यांना आता मार्गदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. 

डॉ. अग्रवाल यांची गेल्या वर्षी ऑरिझोना येथील अमेरिकन कॉलेज ऑफ होमिओपॅथीमध्ये क्लिनिकल अँडव्हायझर ' म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते वर्ल्ड हेल्थ अवेअरनेस ऑर्गनायझेशनचे (पशचित भारत) विभागीय प्रतिनिधी तसेच वर्ल्ड फेडरेशन ऑफ अल्टरनेटीव्ह मेडिसीनचे कार्यकारी सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

Comments