23 of March 2019, at 9.39 am

नको त्या व्हिडीओ, फोटोंच्या कटकटीपासून सुटका

व्हॉट्स अॅपचं नवं फिचर

येस न्युज नेटवर्क - व्हॉट्स अॅपमुळे आपल्या फोनमध्ये अनेक नको असलेल्या फोटो आणि व्हिडीओ फाइल येतात. या फाइल थेट तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे फोनची मेमरी संपते आणि फोनचा स्पीडदेखील कमी होतो. पण या समस्येवर उपाय म्हणून व्हॉट्सअॅपने एका नव्या फिचरचा समावेश केला आहे. मीडिया व्हिजिबिलिटी असं या फिचरचं नाव आहे. व्हॉट्स अॅपच्या बीटा व्हर्जन 2.18.194 मध्ये हे फिचर देण्यात आलं आहे. या फिचरमुळे व्हॉट्स अॅपवरील फाइल्स आता थेट तुमच्या गॅलरीमध्ये जाणार नाहीत, किंवा कोणत्या फाइल्स गॅलरीमध्ये जाव्या अथवा नको ते आता तुम्हाला ठरवता येणार आहे. या फिचरद्वारे तुम्ही कोणा एका व्यक्ती अथवा ग्रुपवरुन येणाऱ्या मीडिया फाइल्स रोखू शकतात. हे फिचर व्हॉट्स अॅपवर गेल्या महिन्यात आलेल्या फिचरचाच एक भाग आहे, पण लेटेस्ट व्हर्जनमध्ये हे फिचर देण्यात आलं नव्हतं. त्यावेळी या फिचरच्या सेटिंगसाठी युजरला फोनच्या डेटा आणि स्टोरेज सेटिंगमध्ये जावं लागत होतं, आणि सर्व कॉन्टॅक्टसाठी एकसाथ ‘हाइड’ आणि ‘शो’ चा पर्याय होता. पण आता हे फिचर तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फो आणि ग्रुप इन्फो येथे देण्यात आलं आहे. कॉन्टॅक्ट आणि ग्रुप इन्फोमध्ये हे फिचर आल्यामुळे तुम्ही एखाद्या खास कॉन्टॅक्टकडून येणाऱ्या मीडिया फाइल्स लपवू शकतात. यासाठी युजरने कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन पाहिजे त्या कॉन्टॅक्टच्या मीडिया व्हिजिबिलिटीला ‘नो’ हा पर्याय निवडावा. महत्त्वाचं म्हणजे बिटा व्हर्जनमध्ये मीडिया व्हिजिबिलिटी फिचर बाय डिफॉल्ट सुरू असेल. व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.18.194 मध्ये हे फिचर देण्यात आलं आहे. हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले बीटाद्वारे डाऊनलोड करता येऊ शकतं किंवा नव्या अपडेटची एपीके फाइल एपीके मिरर येथून डाउनलोड करता येईल.

Comments