18 of February 2019, at 3.52 pm

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा होणार बंद?

मोबाईल नंबर बदलायचा झाल्यास कंपनी देखील बदलावी लागणार

मुंबई : टेलोकॉम कंपन्यांमधील सुरू असलेले प्राईज वॉर दिवसेंदिवस वाढत आहे. चांगल्या ऑफर्स, अनलिमिटेड डाटा आणि कॉलिंगचे स्वस्त दर याचा फायदा मिळवण्यासाठी अनेकजण नंबर पोर्टबिलिटीचा फायदा घेत होतो. नंबर पोर्टबिलिटीची सुविधा बंद करण्यात आली आहे. मार्च 2019 पासून ग्राहकांना मोबाईल नंबर बदलायचा झाल्यास कंपनी देखील बदलावी लागणार आहे. का बंद होणार मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा ? इकोनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार, मोबाईल नंबर पोर्टबिलिटीसाठी काम करणारी एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सॉल्यूशन्स आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी तोट्यात आहे. जानेवारी महिन्यापासून पोर्टिंग फीमध्येही 80% कपात केल्याने त्यांना सतत तोटा होत आहे. मार्च 2019 महिन्यात या कंपन्यांचे लायसन्स संपत असल्याने ही सेवा बंद होणार आहे. ग्राहकांना नुकसान पोर्टबिलिटीची सुविधा बंद पडल्याने ग्राहकांनाच त्याचे नुकसान होणार आहे. कॉलिंग़ रेट, टेरिफ रेट याबाबत ग्राहकांच्या सतत समस्या असतात. यावर सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणं हा सोपा उपाय होता. मात्र सर्व्हिस कंपन्यांनी त्यांचं लायसन्स रिन्यू न झाल्यास त्याजागी पर्याय शोधावा लागणार आहे. त्याद्वारा मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा पुढेही लागू केली जाऊ शकते.

Comments