संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शंकर लिंगे आणि राजन दिक्षीतांना चोप

जनसुनावणीस्थळी जावून मराठा आरक्षणाला विरोधाचं पत्र देताना घडला प्रकार

सोलापूर, दि. 4 ः मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जनसुनावणी सुरु असताना या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आलेल्या माळी महासंघाच्या पदाधिका-यांच्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चोप देत तोंडाला काळं फासलंय..सदरचा प्रकार सोलापूरातल्या शासकीय विश्रामगृहासमोर घडला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर मोर्चे निघाले,मुंबईसह राज्यात शांततेच्या मार्गानं आंदोलनं झाली. मराठ्यांची हीच मागणी समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सोलापूरात आला होता.आरक्षणासंदर्भात शांततेनं निवेदनं सादर केली जात होती.त्याचवेळी माळी महासंघाचे शंकर लिंगे आणि राजन दिक्षीत हे आयोगाला मराठा आरक्षणाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी विश्रामगृहात आले. तेव्हा त्यांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाज कार्यकर्त्यांनी रोखत 'तुमचं जे कांही म्हणणं असेल ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुणे कार्यालयात जावून मांडा' अशी विनंती केली.त्यानंतरही लिंगे यांनी उपस्थितांना 'आम्हांला रोखणारे तुम्ही कोण' ? असा सवाल करत आयोगाला भेटणारचं अशी भूमिका घेतली...या बाबत सकल मराठा समाजातील नागरिकांनी लिंगे आणि दिक्षीत यांना तीन वेळा विनंती केली की 'तुम्ही या जनसुनावणीत अडथळा आणू नका'. 

मात्र लिंगे यांनी त्यांना जुमानले नाही...ते आयोगाच्या दिशेने जात असताना संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लिंगे यांच्या तोंडाला काळं फासत,कपडे फाडून त्यांना चोप दिला....बघा नेमकं काय घडलं विश्रामगृहात....घडल्याप्रकारानंतर पोलीसांनी शंकर लिंगे यांचा बचाव करत गर्दीतून सदर बझार पोलीस ठाण्याकडं रवाना झाले. 

Comments