24 of April 2019, at 1.27 pm

दिल्लीची हैदराबादवर ३९ धावांनी मात

येस न्युज मराठी नेटवर्क : हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर हैद्राबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान रंगलेल्या रोमहर्षक लढतीत दिल्लीनं हैद्राबादवर ३९ धावांनी मात केली आहे. आयपीएलच्या १२व्या मोसमातील ८ सामन्यांमधील ५ मॅच दिल्लीनं जिंकल्या असून गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

सनरायजर्स हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सननं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या संघानं २० षटकांमध्ये ७ गडी गमावत १५५ धावा ठोकून हैद्राबादला १५६ धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र, कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि किमो पॉलच्या दमदार खेळीमुळं हैदराबादचा संघ ११६ धावांत गारद झाला. 

Comments