23 of March 2019, at 10.37 am

PUBG पबजी खेळणाऱ्यांनो सावधान.........!

येस न्युज मराठी नेटवर्क :गुजरातमधील राजकोट येथे सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन पबजी गेम खेळणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. ऑनलाईन गेमवर बंदी घातल्याची नोटीस लावल्यानंतरही ही मुलं ऑनलाईन गेम खेळताना दिसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. अटकेनंतर विद्यार्थ्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

           गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने जानेवरीमध्ये याबाबत निर्देश दिले होते. यानंतर पहिल्यांदाच पोलिसांनी कारवाई करत सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन पबजी गेम खेळणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. राजकोटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरमी गुन्हा दाखल केल्यानंतर जामिनावर विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी ऑनलाईन पबजी गेम खेळणाऱ्यांना इशारा देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे पबजी गेम?
पबजी हा एक ऑनलाईन गेम आहे. यात सहभागी होणाऱ्या खेळाडूला स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी आणि गेम जिंकण्यासाठी दुसऱ्याला ठार मारावे लागते. हिंसक अशा या गेममुळे लहान मुलं आणि किशोरावस्थेतील मुलांवर वाईट परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले. यानंतर गुजरात सरकारने यावर प्रतिंबध लावण्याचे ठरवले आणि तशी नोटीसही जारी केली.

Comments