23 of March 2019, at 9.39 am

सीबीआयमध्ये पाच नवीन संयुक्त संचालकांची नियुक्ती

येस न्युज मराठी नेटवर्क :केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयमध्ये आज बुधवारी पाच नवीन संयुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आयपीएस अधिकारी संपत मीना, अनुराग, राकेश अग्रवाल, वायोलास चौधरी आणि डी. सी. जैन यांची नावे आहेत. केंद्र सरकारच्या कार्मिक विभागातर्फे या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे.

                मीना, अनुराग आणि अग्रवाल हे क्रमशः झारखंड, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशच्या केडरचे 1994च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर डी. सी. जैन हे राजस्थान केडरचे 1991च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. वायोलास चौधरी हे जम्मू-कश्मीर केडरचे 1997च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. या पाच अधिकाऱ्यामध्ये अनुराग, राकेश अग्रवाल, डी. सी. जैन यांनी यापूर्वी सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक, उपमहानिरीक्षक म्हणून काम केलेले आहे. अलोक वर्मा हे सीबीआयचे प्रमुख

Comments