24 of April 2019, at 2.26 pm

'राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घ्यावी : मातोंडकर

मुंबई - काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचा कौतुक केलं आहे. तसेच, राजसाहेबांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची सभा नकोय, असं कुणाला वाटल ? असे म्हणत उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी अप्रत्यक्षपणे आर्जव केलं आहे. 

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवित नाही. मनसेच्या या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. परंतु, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे झोप उडाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविणारे राज ठाकरे यांनी यावेळी मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत.

Comments