24 of April 2019, at 1.43 pm

'हा निळू फुलेंच्या तालीमतला पठ्ठ्या आहे : उदयनराजे

पुणे - खासदार उदनयराजे भोसले यांनी मोदी सरकारवर टीका करताना निळू फुले स्टाईलचा वापर केला. मी निळू फुलेंच्या तालमीमध्ये तयार झालेला पठ्ठ्याय मी. ह्याच्या मायला ह्याच्या बघूनच घेतो, असे म्हणत उदयनराजेंनी मोदी सरकार आणि त्यांच्या कामकाजावर टीका केली. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उदयनराजेंची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, उदयनराजेंनी मोदी सरकारकडून फसवणूक झाल्याचे म्हटले.

पार्थ पवार आता उमेदवार आहेत, पण माझ्यासोबत लवकरच खासदार बनणार असल्याचे सांगत उदयनराजेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. पुण्यात पावसाचे वातावरण होते, पाऊसाचे थेंबही अंगावर पडत होते. तरीही, उदयनराजेंच्या सभेला लोकांनी गर्दी केली होती. मोदी सरकारने देशातील लोकांची फसवणूक केली. लोकांनी, या लोकशाहीतील राजांनी म्हणजेच तुम्ही मोठ्या अपेक्षेने देश मोदींच्या हातात दिला. 

Comments