24 of April 2019, at 1.18 pm

डॉक्टरांच्या निमाकॉन या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन

देशाला सध्या मिश्र वैद्यकीय चिकित्सेची गरजः डॉ. कदम,


 • सोलापूरः देशातील रुग्णांना सध्या मिश्र वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्याबाबत विचार होणे गरजेचे असल्याचे सांगत कॉन्फरन्समुळे डॉक्टरांना नवनवीन विचार ऐकायला मिळतात. त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडते, असे विचार संकल्प कॉर्पोरेशनचे पांडुरंग कदम यांनी व्यक्त केले. निमा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त सिंहगड महाविद्यालयाच्या प्रशस्त आवारात निमाकॉन ही डॉक्टरांची 38 वी राष्ट्रीय परिषद सुरू आहे. त्याप्रसंगी उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
 • यावेळी सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संजय नवले, निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, सीएनएस हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्न कासेगांकर, गोदरेज प्रॉपर्टिझचे प्रतिनिधी डॉ. रूपेश येडके, निमाचे राष्ट्रीय सचिव डॉ.उमाशंकर पांडे, निमाचे राज्याध्यक्ष डॉ. जी.एस.कुलकर्णी, सचिव डॉ. अनिल बाजारे, डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ.भुषण वणी, डॉ. के. त्रिपाठी, डॉ.अनिल श्रीवास्तव, डॉ. जगदीश देशमुख, डॉ. विजय सुर्वे, डॉ. आर. के. त्यागी, डॉ. एम.एल गुप्ता, डॉ. सोपान खर्चे, डॉ. सुभाष गुप्ता, डॉ. उत्तम मते, डॉ. अनिल पत्की, डॉ. राजू ताटेवार, डॉ. गजानन पडघन, डॉ. शैलेश निकम, डॉ. अतुलप्रताप सिंह, डॉ. एस. एच. पांड्या, डॉ. आर. एन. पाठक, डॉ. सुहास जाधव, डॉ. संजय जोशी, डॉ. मनिष जोशी, डॉ. सौ. साधना कुलकर्णी, डॉ. सौ. वैशाली पडघन, डॉ. डी.जी. कदम, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. मनोज सांगळे, डॉ. सौ. स्वप्ना जगदाळे, डॉ. सचिन पांढरे, डॉ. नितीन कोठाले, डॉ. एस.एल. गायकवाड, डॉ. अनिल माने, डॉ. सुभाष भांगे, डॉ. अमोल माळगे, डॉ. धनंजय कुलकर्णी, डॉ. नितीन बलदवा, डॉ. रूपेश येडके, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. ऋषिकेश जोकारे, डॉ. सौ. स्मिता बुब, डॉ. सौ. शर्वरी आयाचित, डॉ. सौ. माधुरी अवसेकर आदी मान्यवर डॉक्टरांची व्यासपिठावर उपस्थिती होती. 
 •     सीएनएस हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्न कासेगांवकर बोलताना म्हणाले की, आपल्या देशात स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. संपूर्ण देशात केवळ 2200 ते 2500 न्यूरॉलॉजिस्ट आहेत. म्हणजेच जवळपास 8 लाख लोकसंख्येमागे केवळ 1 डॉक्टर असल्याचे त्यांनी सांगितले. ही संख्या वाढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
 • प्रारंभी धन्वंतरी देवीची पूजा करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर डॉ. सुभाष वाघे लिखीत पुस्तकाचे आणि निमाकॉन इमेज 2019 स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. निमा संघटनेचा वर्धापनदिन असल्याने मान्यवरांच्या मांदियाळीत केक कापून जय निमा च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी डॉ. एस.बी. हुंडीवाला यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार साधना कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष भांगे यांनी केले. त्यामध्ये 1999 मध्ये सोलापुरात राष्ट्रीय परिषद झाली होती. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर सोेलापुरात ही परिषद होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमाकांत आयाचित, धनश्री केळकर - पुराणिक यांनी केले तर आभार डॉ. अमोल माळगे यांनी मानले.

 • -हायटेक पण पर्यावरणपूरक परिषद
  निमा संघटनेने आयोजित केलेल्या 38 व्या राष्ट्रीय परिषदेत दोन हजार डॉक्टरांच्या उपस्थितीतीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हायटेक पद्धतीने बारकोडचे ओळखपत्र बनवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पर्यावरणाचा संदेश देत प्लॅस्टिकचा वापर टाळण्यात आला आहे. पर्यावरणपूरक वस्तूच वापरण्यावर भर देण्यात आला. याठिकाणी कागदी पेन असून त्याचा वापर झाल्यानंतर ते मातीत पुरल्यास त्याचे रूपांतर रोपात होऊ शकेल.

  -प्रदर्शनात 50 विविध स्टॉल
  प्रदर्शन हॉलकडे जाण्याच्या मार्गावर डॉक्टरांसाठीचे साहित्य, रूग्णांसाठीचे साहित्य विविध औषधे याचबरोबर बांधकाम व्यावसायिकांचे, सौरऊर्जेचे साहित्य असे विविध 50 स्टॉल उभारण्यात आले आहेत.

 •      

Comments