24 of April 2019, at 1.54 pm

मतदान करा अन् मिळवा औषधांत सूट, फ्री लंच

येस न्युज मराठी नेटवर्क : सर्वात मोठ्या लोकशाहीचा 'उत्सव' असलेल्या लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यापारी वर्गही पुढे सरसावला आहे. दिल्लीनजीक नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशननं मतदान करणाऱ्यांना औषधांवर १० टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.

लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदार जागृती केली जात आहे. विविध संस्था, संघटना मतदार जागर करत आहेत. आता व्यापारी संघटनाही मतदार जागृतीसाठी पुढाकार घेत आहेत. मतदान करणाऱ्यांना औषधांवर १० टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप खन्ना यांनी केली.

Comments