24 of April 2019, at 1.57 pm

 मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी युतीच्या उमेदवाराला विजयी करा - चंद्रकांत खैरे 

वैजापुर तालुक्यात झंझावती प्रचार 

औरंगाबाद : नरेंद्र मोदी सरकार ने मागिल ५ वर्षात देशात प्रगतीचा आलेख उंचावला . सोबतच महाराष्ट्रात रस्ते ,पाणी ,वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांनाची सोडवणूक केली.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे धोरण युती सरकारने घेतले समृद्धी महामार्गासारख्या नागपूर,मुंबई एक्सप्रेस हायवे गतिमान केला. सोलापूर धुळे सारखा राष्ट्रीय महामार्ग तयार केला. तसेच जलयुक्त शिवाराची पाणिसिंचनाच्या सोयी करून घेतल्या. माघील ५० वर्षात जे काँग्रेस सरकारला जमले नाही ते केंद्रात आणि महाराष्ट्रात युती सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या . काही अपूर्ण योजना पूर्ण करण्या साठी व कार्यन्वित करण्यासाठी केंद्रात मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी औरंगाबाद  जिल्हयातून मला निवडून द्यावे असे आवाहन शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी वैजापूर तालुक्यातील वाहेगाव, महालगाव, लाडगाव, वैजापुर शहर येथे भाषणात केले. 

आज त्यांचे गंगापूर व वैजापूर तालुक्यात वाहेगाव, महालगाव, लाडगाव, वैजापुर शहर या गावी झंझावती प्रचार दौरा झाला या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी आमदार आर. एम. वाणी, भाजपा जि. अध्यक्ष एकनाथ जाधव, तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, उपजिलहा प्रमुख बाबासाहेब जगजाप, संतोष काळवणे, उपनगरअध्यक्ष शेख साबेरभाई, शहरप्रमुख राजेंद्र साळूंके, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, जि. प. गटनेता अविनाश गलांडे, युवासेनेचे भरत कदम, राजू गलांडे, जि. प. सदस्य रामहरी बापु जाधव, जि. प. सदस्य वैशाली पाटील, मनाली मिसाळ, संजय निकम, सुनभा भोपळे, युवासेना अधिकारी सचिन वाणी, युवासेना शहरअधिकारी अमिर अली, अखील शेट, कय्युमशेट सौदागर, नगरअध्यक्ष शिलपा परदेशी, माजी नगरअध्यक्ष दिनेश परदेशी, भाजपा शहर अध्यक्ष इंगळे, नगरपालिका गटनेता प्रकाश चव्हाण, मार्केट कमटी माजी उपसभापती चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन औताडे अण्णा आदींसह शिवसेना भाजपा, रिपाई, शिवसंग्राम पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments