24 of April 2019, at 1.17 pm

मी गांधीनगरला आल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय - उद्धव ठाकरे 

येस न्युज मराठी नेटवर्क :आमच्यामध्ये मतभेद नक्की होतो, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहे, दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गांधीनगरचे भाजपचे उमेदवार अमित शहा यांना शुभेच्छा दिला. एनडीएच्या गांधीनगरमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरे संबोधित करत होते. मी इथे कसा असा अनेकांना पश्न पडला असून गांधीनगरला आल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांना टोला हाणला. 

 

 

  भाजप अध्यक्ष अमित शहा आद गांधीनगर मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. तत्पूर्वी एका भव्य रोड शो द्वारे गांधीनगरात एनडीए शक्तीप्रदर्शन करणार आहे. तत्पूर्वी झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहांना शुभेच्छा दिल्या. बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊनच मी अमित शहांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो, असेही ठाकरे म्हणाले. 

    अमित शहा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएचे दिग्गज नेते गांधीनगरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान आदि नेते उपस्थित आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शहा यांनी आपले कुटुंबीय तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर नारणपूरमध्ये जात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. 

Comments