23 of March 2019, at 9.53 am

जालन्यात बिंबट्याची दहशत ; दोन वासरावर हल्ला करुन केले ठार...

गणेश जाधव/जालना : जालना जिल्ह्यातील  अंबड-घनसावंगी तालुक्यातीत बिबट्यांने पुन्हा धुमाकुळ घालण्यास सुरवात केली असुन अंबड  तालुक्यातील भार्डी येथिल शेतकरी  कैलास डोईफोडे व एकलहेरा येथिल नारायण दानशुर  यांच्या शेतात बिंबट्याने म्हशीचे दोन वासरावर हल्ला करुन ठार केल्याची घटना घडल्यात या घटनेमुळे अंबड-घनसावंगी तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केलेत. ग्रामस्थांनी काही वेळ या बिंबट्याचा शोधही घेतला परंतु बिबट्या माञ मिळाला नाही. यावेळी भार्डी येथिल आक्रुर कुढेकर यांच्यासह ग्रामस्थांनी या बीबट्याला पकडण्यासाठी पिजरा लावावा अशी मागणी केली.

Comments