23 of March 2019, at 10.32 am

राज्यातील कंत्राटी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री बबनराव लोणीकर

मुंबई - राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांचे वाढदिवसानिमित्त आज मंत्रालयात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने वतीने संघटनेचे राज्य समन्वयक सचिन जाधव यांचे हस्ते तुळशीहार घालून सत्कार करण्यात आला.या प्रसंगी अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात, बाळासाहेब मोरे सोलापूर , राज्य सहाय्यक संवाद सल्लागार दीपाली फुंदे, मनुष्यबळ विकास तज्ञ ज्ञानेश्वर चंदे, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, बीआरसी प्रवीण म्हात्रे, शालेय स्वच्छता तज्ञ सारीका देशमुख, सचिन पाटील कोल्हापूर उपस्थित होते. 

राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी चांगले काम केल्यामुळे देशात राज्याची व विभागाची प्रतिमा उंचावली आहे. जे प्रश्न पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाशी निगडीत आहेत ते तात्काळ मार्गी लावू तर जे अर्थ व नियोजन विभागाशी निगडीत आहेत ते मी स्वत: अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांचेशी बोलून आचारसंहीतेपुर्वी मार्गी लावू.महिला कंत्राटी कर्मचारी यांचे प्रसुती काळातील वेतन देणेसाठी राज्यातील सर्व विभागाची कंत्राटी कर्मचारी यांना हा निर्णय लागू करावा लागत असल्याने तो सामान्य प्रशासन विभागाशी बोलू हा प्रश्न सोडविणेत येईल.

स्वच्छतेत काम करणारे कर्मचारी यांचे परिश्रमाची मी सुरूवातीपासून दखल घेतली आहे.यावेळी अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल म्हणाले,  बीआरसी व सीआरसी यांचे वेतन वाढीबाबत अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठविणेत आला आहे. एकत्रीत असणारे TA व DA स्वतंत्र रित्या कसा देतां येईल याचा विचार करून प्रश्न मार्गी लावता येईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनवाढ व इतर प्रश्नाबाबत राज्य समन्वयक सचिन जाधव व शिष्टमंडळाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांना निवेदन सादर केले. 

या प्रसंगी राज्य समन्वयक सचिन जाधव म्हणाले,  राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर आम्ही कार्यरत आहोत.
आपल्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करणेसाठी कंत्राटी कर्मचारी यांनी नियोजन केले आहे.महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामांची दखल केंद्र सरकारने घेऊन आपला व विभागाचा यथोचित गौरव केला आहे.गेल्या साडेचार वर्षात आपल्या मार्गदर्शनाखाली झालेले काम भुषणावह आहे.राज्याने राबविलेले कुटूंब संपर्क अभियान, संकल्प स्वच्छतेचा ,  स्वच्छ महाराष्ट्राचा हे अभियान तर केंद्र शासनाने राबविलेले आहे.स्वच्छता ही सेवा व राष्ट्रीय स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८ व स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा आदी विविध अभियानात राज्याचा गौरव झालेला आहे. 

जिल्हा स्तरावर असलेले तज्ञ कर्मचारी यांनी तसेच बी.आर.सी.व सी.आर.सी, ग्रामलेखा व पाणी गुणवत्ता सल्लागार यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. कंत्राटी कर्मचारी प्रकल्पात काम करतात.त्यांना ७ वा वेतन आयोग नाही.वैद्यकीय सुविधा व विमा याबाबत कोणतेही मदत नाही.अशा स्थितीत खालील प्रश्न मार्गी लावावेत. 

बी.आर.सी.व सी.आर.सी. यांना वेतनवाढी बाबत नस्ती अर्थ विभागात सादर करण्यात आली आहे.आपल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. जिल्हास्तरावरील तज्ञांनी जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केलेने एकुण पगाराचे किमान २५ टक्के पगार वाढ करण्यात यावी ,  जिल्हास्तरावरील तज्ञ कर्मचारी यांना देण्यात येणारे रू.५०००/- प्रोत्साहन अनुदानाची जाचक अट रद्द करून ते पगाराबरोबर एकत्रीत देणेत यावे,  विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी महिलांना किमान ६ महिन्याची प्रसुती रजा पगारी देणेत यावी , बी.आर.सी.व सी.आर.सी.यांना TA व DA स्वतंत्र मंजुर करणेत यावा तसेच वैद्यकीय सुविधा व विमा आदी सुविधा मिळाव्यात.अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

जलसुरक्षकांचे मानधन वाढवा : जाधव 
भुजल सर्व्हेक्षण विभाग व जलसुरक्षक हे गाव पातळींवर पाण्याचे संरक्षण व संवर्धनाचे काम करतात. पाणी शुध्दीकरणाबरोबरच पाणी नमुने तपासणीचे महत्वाचे काम करतात. हा विभाग दुर्ळक्षित आहे. या विभागातील कर्मचारी यांचे मानधनात वाढ करणेची मागणी यावेळी कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी केली.

Comments