23 of March 2019, at 10.42 am

युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा

मुंबई : सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा, असा सल्ला शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नीने दिला आहे.

.निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता आणि कायम राहील. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल… अशी भावना वीरपत्नीने व्यक्त करत खोट्या देशभक्तीचा बुरखा अंगावर घेतलेल्यांना त्यांनी सणसणीत चपराक लगावली आहे.

सैन्यात सामील होऊन मग खरा अनुभव घ्या… आम्हाला युद्ध नकोय… युद्धात काय नुकसान होतं हे तुम्हाला माहिती नाही. आता आणखी ‘निनाद’ जाता कामा नये, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे.

आता वीरपत्नीच्या आवाहनानंतर तरी असल्या सोशल मीडियावरून युद्धाच्या पोस्ट बंद होतील, अशी आपण अपेक्षा करूयात…

Comments