24 of April 2019, at 1.39 pm

'रक्तमुखी' व 'कांचनमृग' कथांचे सादरीकरण

जीएंच्या 'रमलखुणा' पुस्तकाचे मंगळवारी सोलापुरात प्रकाशन

सोलापूर दि.७  - ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर आणि हिराचंद नेमचंद वाचनालय यांच्यावतीने मंगळवारी( 10 जुलै ) रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्पी थिएटरमध्ये  सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात लेखक विजय पाडळकर यांनी लिहिलेल्या 'जीएंच्या रमलखुणा' या पुस्तकाचे प्रकाशन मसाप सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या हस्ते होणार आहे. मसाप पुण्याचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत लावणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पुस्तक प्रकाशनानंतर जी. ए . कुलकर्णी यांच्या 'रक्त मुखी ' आणि 'कांचनमृग ' या दोन कथांचे दृकश्राव्य सादरीकरण शरद आढाव करतील, अशी माहिती मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी व हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ श्रीकांत येळेगावकर यांनी दिली.      साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जी. ए. कुलकर्णी यांच्या मराठी कथांचा अनुवाद इंग्रजी आणि कानडीत करण्यात आला आहे. बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालयात जीए स्मृती दालन झाले असून त्याठिकाणी यांचे हस्ताक्षर, जन्म कुंडली, इतकेच नव्हे तर त्यांची पायधूळ अत्तर कुपीमध्ये मिरवते आहे . 
जी.ए.कुलकर्णी यांचा जन्मदिवस त्यांच्या भगिनी नंदा पैठणकर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. सुनीता देशपांडे, कवी ग्रेस, डॉ.श्रीराम लागू , रा. चि. ढेरे यांना' प्रिय जीए सन्मान" देऊन त्यांचा गौरव केला आहे. पुण्यात यापूर्वी झालेल्या सन्मान सोहळ्यात सोलापूरच्या जवळीक संस्थेने "कैरी "आणि "प्रदक्षिणा" या दोन एकांकिका सादर केल्या होत्या.

Comments