आता बारमध्येही प्या ...एमआरपीच्या दरात...

बारमालकांच्या मनमानीला सरकारचा लगाम

मुंबई दि.१५ : अव्वाच्या सव्वा रक्कम बारमालकांकडून बारमध्ये मद्यपान करताना आकारले जात असल्यामुळे नाराज मद्यप्रेमींना दिलासा मिळणार आहे. लवकरच एमआरपीमध्ये म्हणजेच छापील किंमतीत बारमध्ये दारु विकत घेणे शक्य होणार आहे. याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात राज्य सरकार आहे.राज्यातील बारना एफएल २ परवाना जारी करण्याचा विचार फडणवीस सरकार करत असून ही पावले महसूल वाढवण्याच्या दृष्टीने उचलण्याची तयारी असल्यामुळे दहा टक्के वाढ उत्पादन शुल्कात होण्याचा अंदाज सरकारचा आहे. मद्य विक्रीची परवानगी एफएल २ परवाना देतो, पण त्या परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल ३ परवाना दिला जातो. म्हणजेच फक्त अल्कोहोल सर्व्ह करण्याचा परवाना देण्यात येतो. मद्यप्रेमी आता बारमधून दारु एमआरपीमध्ये विकत घेऊ शकतात. त्यानंतर हवे त्या ठिकाणी मद्यपान करु शकतात, असे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.पण या निर्णयाची धास्ती वाईन शॉपमालकांना वाटत आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाईन शॉपधारकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Comments