18 of February 2019, at 3.53 pm

बॅटरीवर चालणा-या ई रिक्षांची नोंदणी करुन ट्रेड सर्टिफइकेट द्या !

पक्षकार संघाची जिल्हाधिकारी आणि आरटीओंकडे मागणी

सोलापूर, दि. ९-- सोलापूर शहरातलं वाढतं प्रदुषण कमी करण्यासाठी बॅटरीवर चालणा-या ई रिक्षांची नोंदणी करण्यास तातकाळ सुरुवात करावी तसेच  वितरकांना ट्रेड सर्टिफइकेट देण्यात यावं अशी मागणी पक्षकार संघाच्यावतीन करण्यात आलीय. यासंदर्भात सरकारनं सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन सरकारनं  एका महिन्यात ई रिक्षांची नोंदणी करावी असे आदेश उच्च न्यायालयानं २४ जानेवारीला पारित केले आहेत तर शासन स्तरावर धोरणात्मक निर्णयही घेण्यात आलाय.मात्र सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि आरटीओ  आधिकारी कार्यालयाकडून या निर्णयाच्या अमंलबजावणीला विलंब होत आहे.असा आरोपही पक्षकार संघटनेचे सहसचिव बसवराज येरनाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. 

या पत्रकार परिषदेला अॅड. राजन दिक्षीत,डी.एन. भडंगे, कल्पना शर्मा आदी उपस्थित होते....

Comments