शासनाकडून आलेले ६५ लाख रुपये गेले परत

जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शासनाकडून आलेले ६५ लाख रुपये मार्चअखेर नंतर परत करावे लागले आहेत

सोलापूर : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी शासनाकडून आलेले ६५ लाख रुपये मार्चअखेर नंतर परत करावे लागले आहेत. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या प्रशासकीय अज्ञानामुळे शिक्षकांना हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. तर हा निधी पुन्हा परत मिळविता येईल. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण संजयकुमार राठोड यांनी दिले आहे. 

शिक्षकांना १२ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वेतनवाढीचा लाभ मिळतो. १२ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर शिक्षक मंडळी संस्था चालकांकडे पाठपुरावा करून प्रस्ताव तयार करून घेतात. हा प्रस्ताव वेतन अधीक्षकांकडे पाठविला जातो. यंदा वेतन अधीक्षकांनी जिल्ह्यातील ४२ शाळांतील हे प्रस्ताव शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या नजरेखाली घातले होते. जवळपास ६५ लाख रुपयांची ही रक्कम होती.

 

Comments